नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 66 हजार 732 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 71 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.
66 हजार नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 71 लाखांवर!
काल दिवसभरात एकूण 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 9 हजार 150 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 71 लाख 20 हजार 539 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 61 हजार 853 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 9 हजार 150 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 71 लाख 20 हजार 539 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 61 हजार 853 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 61 लाख 49 हजार 536 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात 9 लाख 94 हजार 851 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 78 लाख, 72 हजार 93 एवढी झाली आहे.