नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 70 हजार 496 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 69 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
गेल्या २४ तासांमध्ये देशात 70 हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 69 लाखांवर
काल दिवसभरात एकूण 964 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 6 हजार 490 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 69 लाख 6 हजार 152 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 93 हजार 592 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये देशात 70 हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 69 लाखांवर
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 964 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 6 हजार 490 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 69 लाख 6 हजार 152 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 93 हजार 592 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 59 लाख 6 हजार 70 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा :'बाबा का ढाबा' : व्हायरल व्हिडिओनं पालटलं नशीब; कोणीच जात नव्हते तिथे लागल्या ग्राहकांच्या रांगा