नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 79 हजार 476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 64 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत माहिती दिली.
भारतात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला 1 लाखाचा टप्पा; बाधितांचा आकडा 64 लाखांवर
भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीनेही १ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात १०६९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच, शनिवारी दिवसभरात एकूण 1,069 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 842 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 64 लाख 73 हजार 545 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 44 हजार 996 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 54 लाख 27 हजार 707 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, शनिवारी दिवसभरात 11लाख 32 हजार 675 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 78 लाख, 50 हजार 403 एवढी झाली आहे.