नवी दिल्ली :गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 89 हजार 706 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 43 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.
देशात ८९ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णसंख्या ४३ लाखांवर - भारत कोरोना
देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 73 हजार 890 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 43 लाख 70 हजार 129 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत...

देशात ८९ हजार नव्या रुग्णांची नोंद; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४३ लाखांवर
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,115 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 73 हजार 890 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 43 लाख 70 हजार 129 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 33 लाख 98 हजार 845 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.