महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताचे पहिले सी-प्लेन अहमदाबादला पोहोचले, पंतप्रधान करणार उद्घाटन

गुजरातमध्ये 31 ऑक्टोबरपासून सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली सागरी विमानसेवा साबरमती रिव्हरफ्रंट ते स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत असणार आहे.

sea-plane reaches Ahmedabad.
समुद्र-विमान अहमदाबादला पोहोचले.

By

Published : Oct 27, 2020, 9:12 AM IST

अहमदाबाद- राज्यात 31 ऑक्टोबरपासून सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली सागरी विमानसेवा साबरमती रिव्हरफ्रंट ते स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत राहणार आहे. सोमवारी चाचणीसाठी सी-प्लेन केवडिया येथून अहमदाबादला पोहचले आहे.

सुरूवातीला मालदिवहून हे विमान कोची येथे इंधन भरण्यात आले आणि गोव्यावरून केवडियामार्गे अहमदाबादला पोहोचले. सी-प्लेनची चाचणी घेण्यात आली. 31 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडिया ते अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटकडे सी-प्लेन ने जातील.

हेही वाचा-देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर!

कोरोनामुळे प्रवासी क्षमतेवर निर्बंध

दोन परदेशी वैमानिकांसह सी-प्लेन साबरमती नदीत दाखल झाले आहे. हे सी-प्लेन अहमदाबादहून केवडियाला दररोज 8 ट्रिप करेल. ज्यामध्ये 220 किमी चा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण होईल. परदेशी पायलट समुद्री विमानाच्या पायलटला 6 महिन्यांसाठी प्रशिक्षण देणार आहे. या सी-प्लेनमध्ये 19 लोकांची क्षमता आहे. मात्र, कोरोना साथीच्या आजारामुळे सध्या केवळ 14 लोकांना सामावून घेतले जाईल. त्यातील 5 क्रू मेंबर्स असतील. एका व्यक्तीच्या तिकिटाची किंमत 4,800 रुपये आहे. पंतप्रधान मोदी 31 ऑक्टोबरला सी-प्लेनचे उद्घाटन करतील.

हेही वाचा-'आई-वडिलांच्या फोटोंची लाज वाटते का?'; रवीशंकर प्रसादांची तेजस्वी यादवांवर बोचरी टीका

30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम

  • दुपारी 3 वाजता केवडिया हेलिपॅड येथे आगमन.
  • प्रथम जंगल सफारी पार्कचे उद्घाटन
  • फेरी बोटचे उद्घाटन
  • भारत भवन, एकता मॉल, चिल्ड्रन पार्क, ग्लो गार्डन, कॅक्टस गार्डन, एकता नर्सरीचे उद्घाटन
  • संध्याकाळी 6 तासानंतर केवडिया येथे थांबतील

31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम

  • सायंकाळी 7 वाजता आरोग्य वनाचे उद्घाटन.
  • सकाळी 7.30 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार पटेल यांचे चरणपूजन
  • रात्री आठ वाजता राष्ट्रीय एकत्रीकरण परेड येथे उपस्थिती
  • सकाळी 8.45 वाजता राष्ट्र जोग संदेश
  • 9 वाजता नंतर आयएएस आभासी संवाद
  • सी-प्लेनचे उद्घाटन करून अहमदाबादला रवाना होतील

ABOUT THE AUTHOR

...view details