महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांत 45 हजार 720 जणांना संसर्ग ; तर 1 हजार 129 जणांचा बळी - देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 12 लाख 38 हजार 635 वर पोहचली आहे. तर यामध्ये 4 लाख 26 हजार 167 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 7 लाख 82 हजार 606 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 29 हजार 861 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jul 23, 2020, 10:34 AM IST

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुगणांच्या संख्येत वाढच होत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल 45 हजार 720 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 129 जणांचा मृत्यू झाला.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 12 लाख 38 हजार 635 वर पोहचली आहे. तर यामध्ये 4 लाख 26 हजार 167 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 7 लाख 82 हजार 606 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 29 हजार 861 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.

देशातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात आतापर्यंत 12 हजार 556 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 3 लाख 37 हजार 607 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 37 हजार 282 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 87 हजार 769 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 26 हजार 323 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 719 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 51 हजार 399 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 224 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 86 हजार 492 कोरोनाबाधित तर 3 हजार 144 जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 263 , पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 221 तर कर्नाटकमध्ये 1 हजार 519 जणांचा बळी गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details