नवी दिल्ली -भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 5 हजार 609 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 132 जण दगावले आहेत.
गेल्या 24 तासांत आढळले 5 हजार 609 कोरोनाबाधित, तर 132 जणांचा बळी - COVID-19 deaths reported
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 12 हजार 359 वर पोहचला आहे. तर यात 63 हजार 624 अॅक्टिव्ह केस आहेत. तर 3 हजार 435 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 12 हजार 359 वर पोहचला आहे. तर यात 63 हजार 624 अॅक्टिव्ह केस आहेत. तर 3 हजार 435 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
देशातील कोरोनामधून बरे होण्याचा रुग्णांचा दर वाढून 39.62 टक्के झाला आहे. देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर रुग्णांचा बरे होण्याचा दर हा 7.1 टक्के तर दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान 11.42 टक्के एवढा होता. तिसरे लॉकडाऊन सुरू असताना हाच दर वाढून 26.59 टक्के झाला होता.