महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात गेल्या २४ तासांमध्ये ८३ हजार कोरोना रुग्णांची नोंद; एकूण संख्या ३९ लाखांवर...

गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ८३ हजार ३४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०९६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशभरात ३९ लाख ३६ हजार ७४८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ३१ हजार १२४ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत...

India's COVID-19 tally goes past 39 lakh; recoveries crosses 30-lakh mark
देशात गेल्या २४ तासांमध्ये ८३ हजार कोरोना रुग्णांची नोंद; एकूण संख्या ३९ लाखांवर...

By

Published : Sep 4, 2020, 11:54 AM IST

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ८३ हजार ३४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३९ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०९६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ६८ हजार ४७२ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ३९ लाख ३६ हजार ७४८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ३१ हजार १२४ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत ३० लाख ३७ हजार १५२ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

सध्या देशातील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचा दर हा ७७,१५ टक्के आहे. तर, मृत्यूदर हा कमी होऊन १.७४ टक्क्यांवर गेला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात ४.६६ कोटी कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

हेही वाचा :ग्लोबल कोव्हिड-१९ ट्रॅकर : जगभरातील कोरोना रुग्णसंख्या अडीच कोटींच्या पुढे; सुमारे ९ लाखांचा बळी...

ABOUT THE AUTHOR

...view details