नवी दिल्ली -देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता लाखाच्या घरात पोहचली आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णाचा दरही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
सध्या देशात 58 हजार कोरोना अॅक्टीव्ह केसेस आहेत. यामध्ये 2.9 टक्केच लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरामध्ये आतापर्यंत 24 लाख 25 हजार 742 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारत इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत असून कोरोना संकटात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.