हैदराबाद :भारतातील कोरोनाचे पहिली लस तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. 'कोव्हॅक्सिन' असे या औषधाचे नाव आहे. भारत बायोटेक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयएमसीआर), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे या लसीचे संशोधन केले आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा नमुना एनआयव्हीमधून भारत बायोटेकमध्ये आणण्यात आला होता, त्यानंतर त्यावर संशोधन करुन ही लस तयार करण्यात आली आहे.
कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार; 'कोव्हॅक्सिन'ची मानवी चाचणी होणार जुलैमध्ये.. - पहिली भारतीय कोरोना लस
भारत बायोटेक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयएमसीआर), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे या लसीचे संशोधन केले आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा नमुना एनआयव्हीमधून भारत बायोटेकमध्ये आणण्यात आला होता, त्यानंतर त्यावर संशोधन करुन ही लस तयार करण्यात आली आहे.
कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार; 'कोव्हॅक्सिन'ची मानवी चाचणी होणार जुलैमध्ये..
भारत बायोटेकने या लसीच्या संशोधनाचे निष्कर्ष भारतीय औषध नियंत्रक जनरल - सीडीएससीओ आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सादर केले होते. यानंतर सरकारने त्यांना या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. जुलै महिन्यामध्ये देशभरात या चाचण्या घेण्यात येतील. भारत बायोटेकचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक डॉ. क्रृष्णा इल्ला यांनी याबाबत माहिती दिली.