पोरबंदर (गुजरात) - जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील विविध देशांमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय नौदलाने समुद्र सेतू मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत नौसेनेचे आयएनएस शार्दूल जहाज इराणमध्ये अडकलेल्या २३३ भारतीयांना घेऊन आज पोरबंदरला पोहोचले आहे.
इराणमधील २३३ भारतीयांना घेऊन आयएनएस शार्दूल पोरबंदरमध्ये दाखल - gujrat corona update
इराणहून गुजरामधील पोरबंदर बंदरावर २३३ प्रवासी परतले. येथे आल्यानंतर सर्व प्रवाशांचे स्क्रिनींग आणि वैद्यकीय चाचणी केली गेली. यापैकी बहुतांश प्रवासी हे वलसाडचे मच्छिमार आहे. त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी पुढील प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल.

विदेशात अडकलेल्या भारतियांना मायदेशी आणण्यासाठी ८ मे रोजी ऑपरेशन समुद्र सेतू सुरू करण्यात आले. आतापर्यंत मालदीव आणि श्रीलंकातून २८७४ लोकांना जलश आणि मगरमच्छ जहाजमधून देशात आणले गेले. तसेच इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना देशात आणण्यासाठी २ जूनपासून मोहीम राबवण्यात आली. इराणमधील भारतीयांना वैद्यकीय तपासणीनंतरच आयएनएस शार्दूल जहाजापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. अतिरिक्त वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, आहार विशेषज्ञ, मेडीकल स्टोर, राशन, मास्क आणि इतर जिवनावश्यक उपकरणांसह हे विशेष जहाज तयार करण्यात आले होते.
इराणहून गुजरातमधील पोरबंदर बंदरावर २३३ प्रवासी परतले. येथे आल्यानंतर सर्व प्रवाशांचे स्क्रिनींग आणि वैद्यकीय चाचणी केली गेली. यापैकी बहुतांश प्रवासी हे वलसाडचे मच्छिमार आहे. त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी पुढील प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल.