दिल्ली - चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणुची झळ आपल्या नागरिकांना बसू नये, यासाठी भारत सरकारने वुहानमधून तब्बल ३२४ भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट केले आहे. यातील काही नागरिकांना भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावला कॅम्पमध्ये तर इतरांना हरियाणाच्या मानेसरमधील सैन्य शिबिरामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धसका; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द!