महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत- चीन सैन्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष, चिनी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला - चीन

नियंत्रण रेषेवरून पुन्हा एकदा भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न रोखल्याची माहिती आहे.

चीन-भारत
चीन-भारत

By

Published : Aug 31, 2020, 11:29 AM IST

Updated : Aug 31, 2020, 12:57 PM IST

नवी दिल्ली -भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न रोखल्याची माहिती आहे.

पँगाँग लेक परिसरात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला असून भारतीय सैनिक सुरक्षीत असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान, त्यानंतर भारतीय सैन्याने संबधित परिसरामध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. गेल्या 15 जुनला झालेल्या चकमकीनंतर ही दुसरी मोठी घटना आहे.

सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्य प्रयत्नशील आहे. मात्र, त्याचप्रमाणे भारत आपली प्रादेशिक अखंडता जपण्यासाठीही कटीबद्ध आहे. चुशुल येथे ब्रिगेड कमांडर स्तरीय बैठक सुरू असून सीमा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते अमन आनंद यांनी सांगितले.

लडाखच्या पूर्वेकडील पँगाँग त्सो, गलवान खोरे, डेपसंग प्लेन्स आणि गोगरा या प्रदेशांवर चीनने हक्क सांगितल्यानंतर, भारत आणि चीनदरम्यान तणाव आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. जुलैच्या मध्यवधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. पँगाँग त्सो, डेपसांग या भागातून चीन मागे हटायला तयार नसल्याने चर्चा पुढे जात नसल्याची माहिती आहे. एकीकडे कोरोनाचे संकट वाढत चाललेले असताना आता सीमेवरतीही चीनमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.

Last Updated : Aug 31, 2020, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details