महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाहा शाळेतल्या मुला-मुलीचा परफेक्ट स्टंट ! ३ लाखांहून अधिक व्ह्यूज - व्हिडिओ जोरदार व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन शाळेतील विद्यार्थी रस्त्यातच स्टंट करताना पाहायला मिळाले आहेत.

पाहा शाळेतल्या मुला-मुलीचा परफेक्ट स्टंट! ३ लाखांहून अधिक व्ह्यूज

By

Published : Sep 1, 2019, 1:47 PM IST

नवी दिल्ली -सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन शाळेतील विद्यार्थी रस्त्यातच स्टंट करताना पाहायला मिळाले आहेत.

या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मुलगा उडी मारतो आणि त्यानंतर मुलगी उडी मारल्याचे पाहायला मिळते. एखाद्या जिम्नास्टिकलाही लाजवेल असे परफेक्ट स्टंट त्यांनी केले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून याला प्रचंड लाईक्स आल्या आहेत.

हे ही वाचा - शिक्षकानं पुरवला बायकोचा हट्ट; पत्नीसाठी गावात बोलावलं हेलिकॉप्टर


एका युजरने हा व्हिडिओ केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना टॅग केला आहे. मी आशा करतो की, या मुलांमध्ये भारत गुंतवणूक करेल आणि त्यांना जागतिक स्तरावर खेळण्याचे योग्य प्रशिक्षण देईल असे एका दुसऱ्या युजरनं टि्वटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी मध्यप्रदेशमधील एक युवकाचा अनवाणी पायाने १०० मी. शर्यत पूर्ण करतानाचा व्हिडिओ पाहायला मिळाला होता.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details