नवी दल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे मिळून कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी करत आहेत. यामध्ये रेल्वे विभागही मागे राहीला नाही. लाखो प्रवासी दररोज रल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे विभागाने गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
#coronavirus: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे गाड्यांचही निर्जंतुकीकरण
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे विभागाने गाड्यांचे निर्जंतूकीकरण करण्यास सुरूवात केली आहे.
याबरोबरच पोस्टर आणि रेल्वे स्टेशनवर उद्घोषणांद्वारे प्रवाशांना कोरोनाच्या धोक्यापासून जागरूक करण्यात येत आहे. रेल्वेमधील शौचालयाबरोबरच सर्व डबे ठरावीक काळाने स्वच्छ करण्यात येत आहेत. खबरदारीचे सर्व उपाय रेल्वे स्टेशनवर करण्यात येत आहेत.
देशातील कोरोनाचा प्रसार पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने सर्व लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लष्कराने आपल्या जवानांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. मालदीव, श्रीलंका आणि नेपाळ देशांच्या प्रमुखांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता कोरोनाला लढा देण्यासाठी 'सार्क' देश एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.