महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...म्हणून ४ डिसेंबर 'नौदल दिन' म्हणून साजरा केला जातो - 48th-indian-navy-day

आज भारतीय नौसेना दिवस है. देश 1971 में पाकिस्‍तान के खिलाफ ऑपरेशन ट्राइडेंट में हासिल हुई जीत को याद करते हुए हर साल इस दिन जश्न मनाता है. इस विशेष मौके पर देखें ईटीवी भारत की खास पेशकश...

भारतीय नौदल दिन
भारतीय नौदल दिन भारतीय नौदल दिन

By

Published : Dec 4, 2019, 8:08 AM IST

विशाखापट्टणम - कुठल्‍याही देशात सैन्‍य दलाला अनन्य साधारण महत्‍त्‍व असते. सैन्‍य दलाच्‍या वेगवेगळ्या शाखाही असतात. पण, ज्‍या देशांना समुद्री किनारा आहे त्‍या देशातील नौदलाला तर खूप सर्तक राहावे लागते. आज (4 डिसेंबर) भारतीय नौदल दिन आहे. जगातील शक्‍तीशाली नौदलामध्‍ये भारतीय नौसेनाचा समावेश आहे.

४ डिसेंबर 'नौदल दिन' म्हणून साजरा केला जातो


1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडंट. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.


48 व्या भारतीय नौदल दिनी आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आणि इतर मुख्य अधिकारी देखील सामील होणार आहेत. नौदल दिनानिमित्ताने भारतीय हवाई दलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात नौदलाने आपली सर्व शस्त्रे सादर करून त्याच्या सामर्थ्याचा नमुना सादर केला आहे.

नौदल दिनानिमित्ताने भारतीय हवाई दलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.


इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details