फ्रँकफर्ट - जर्मनीत राहणाऱ्या काश्मीरी आणि पंजाबी नागरिकांवर पाळत ठेवल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर खटला दाखल करण्यात आला आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बलवीर(५४) भारतीय गुप्तचर संस्थेबरोबर २०१५ सालापासून काम करत असल्याचा आरोप सरकारी वकिलाने केला आहे.
जर्मनीतील शीख आणि काश्मिरींवर पाळत ठेवल्याप्रकरणी भारतीय नागरिकावर खटला
भारत विरोधी शीख आणि काश्मीर चळवळीत कितीजण सहभागी आहेत, याची माहिती बलवीरने भारतीय अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
संग्रहित छायाचित्र
भारत विरोधी शीख आणि काश्मीर चळवळीत कितीजण सहभागी आहेत, याची माहिती बलवीरने भारतीय अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. काश्मीर चळवळीतील नातेवाईकांची माहितीही बलवीरने मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. फ्रँकफर्ट विभागीय न्यायालयात हा खटला २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातही याच न्यायालयाने एका भारतीय जोडप्यावर हेरगिरीचा ठपका ठेवला होता.