नवीदिल्ली - भारतीय सैन्य अकादमीची (आयएमए) आज पासिंग आऊट परेड पार पडली. यावेळी दक्षिण पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल चेरिश मैथसन यांनी पुनरावलोकनाधिकारी म्हणून परेडच्या सलामीचा स्विकार केला. यावेळी ४५९ तरुण कॅडेट परेडचा भाग बनले.
कॅडेट परेडचा भाग बनलेल्यापैकी ३८२ तरुण भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होणार आहेत. तसेच उर्वरित अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, फिजी, मॉरिशस, पापुआ न्यू गिनी, टोंगा, लेसोथो आणि ताजिकिस्तान या ९ मित्र देशांचे ७७ तरुण त्यांच्या देशातील सैन्यात अधिकारी पदावर रूजू होणार आहेत.