नवी दिल्ली- भारताचे वैद्यकीय पथक आज इराणमध्ये पोहचेल. तसेच, आजच तिथे पहिले आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रयत्न करेल. देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. तसेच, कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे कामही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
"इराणमध्ये अडकलेले भारतीय आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी माहिती - आमचे वैद्यकीय पथक हे आज इराणमध्ये पोहोचेल. तसेच, क्वूममध्ये आज संध्याकाळपर्यंत पहिले आरोग्यकेंद्र उभारण्यात येईल अशी आशा आहे. त्यानंतर तातडीने तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच, इराणच्या अधिकाऱ्यांसह तेथे अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासंबंधी चर्चा सुरू आहे.", अशा आशयाचे ट्विट जयशंकर यांनी केले.