नवी दिल्ली - भारताने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर चीन आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा असल्याचे सांगितले आहे. तसेच, आमच्या देशांतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नका असा सज्जड इशारा त्यांनी चीन आणि पाकिस्तानला दिला आहे. चीनी अध्यक्ष झी जिनंपिंग आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या जम्मू-काश्मीरविषयी चर्चा झाली या पार्श्वभूमीवर भारताने तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आमच्या देशांतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नका - परराष्ट्र मंत्रालय - Chinese President Xi Jinping on Kashmir
चीनी अध्यक्ष झी जिनंपिंग आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या जम्मू-काश्मीरविषयी चर्चा झाली या पार्श्वभूमीवर भारताने तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
रवीश कुमार
भारताचे आधीपासून जम्मू-काश्मीरविषयी स्पष्ट भूमिका घेतली आहे. काश्मीरचा राज्याचा दर्जा बदलणे, तेथील आर्टिकल ३७० हटवणे या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत. यामध्ये कोठेही आंतरराष्ट्रीय सीमा, नियमांचे उल्लंघन केलेले नाही. पाकला तसेच, चीनला लागून असलेल्या सीमेवर कोणताही प्रभाव पडलेला नाही. अशा परिस्थितीत या देशांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणे योग्य नाही, असे भारताने सुनावले आहे.
TAGGED:
indian mea to china pakistan