पणजी- दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-२९ ने उड्डाण घेत असताना अचानक पेट घेतला. या घटनेमुळे आज (शनिवार) दुपारी २ तासांसाठी विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.
गोव्यात उड्डाण घेत असताना मिग-२९ लढाऊ विमानाला लागली आग - लढाऊ
मिग-२९ विमान उड्डाण घेत असताना टाकी कोसळली. त्यामुळे विमानाने पेट घेतला. यामध्ये कोणालाही हानी झाली नसून पायलट आणि विमान दोन्ही सुरक्षित आहेत.
पेट घेतलेले विमान
मिग-२९ विमान उड्डाण घेत असताना टाकी कोसळली. त्यामुळे विमानाने पेट घेतला. भारतीय नौदल प्रवक्त्यांनी यासंदर्भात ट्वीट करत लिहिले, भारतीय वायुसेनेचे मिग-२९ विमान दाबोळी विमानतळावरून उड्डाण घेत असताना वेगळी होऊ शकणारी टाकी धावपट्टीवर कोसळली. यामुळे विमानाने पेट घेतला.
धावपट्टीवर इंधन सांडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ २ तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोणालाही हानी झाली नसून पायलट आणि विमान दोन्ही सुरक्षित आहेत.