१७८० मध्ये, जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यापासून जगात तीन औद्योगिक क्रांती झाल्या. चौथी क्रांती आता घडत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आमचे जीवन आणि उपजीविका यामध्ये झपाट्याने परिवर्तन घडवत आहे. ते मानवाला सहकारी मानवाशी जोडण्याबरोबरच, मानवाला यंत्राशी जोडत आहे. २६ लाख रोबोंना जगभरात नोकरीवर ठेवले आहे, हे लक्षात घेता, आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीचे स्वरूप आणि स्वभाव यांची कल्पना करू शकतो. कृत्रिम बुद्धीमत्ता, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, थ्रीडी प्रिंटिंग, ब्लॉकचेन, आभासी वास्तव, यंत्र शिक्षण जगाचा चेहरा बदलवत आहेत. बँका अगोदरच आपल्या ग्राहकांची कर्ज फेडण्याची क्षमता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून अंदाज घेत आहेत. कर्ज मंजूर करताना, व्यवस्थापकांच्या ऐवजी बिग डेटा अॅनालेटिक्सचा उपयोग केला जात आहे. काही संघटनांमध्ये, मानवी वकिलांची जागा रोबो वकिलांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अहवाल आणि कंपनीचे ताळेबंद स्वयंचलित झाले आहेत. ऑटोमेशनमुळे, कंपन्यांची उत्पादकता, कार्यक्षमता आणि नफाक्षमता वाढणार आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे, विशेषतः बिग डेटामुळे, २०३० पर्यंत जागतिक जीडीपी १४ टक्क्यांनी वाढेल, असे अनुमानित करण्यात आले आहे. 'प्राईस वॉटर हाऊस कुपर्स'ने १५.७ लाख कोटी रूपयांइतकी ही वाढ असेल, असे अनुमान केले आहे.
अमेरिकेत, ४५ टक्के नोकऱ्या ऑटोमेशनमुळे जाणार आहेत. भारतासारख्या देशात, जेथे वेतन कमी आणि कर्मचारी उपलब्धता अधिक असल्याने, ऑटोमेशनचा परिणाम होण्यास थोडा वेळ लागेल. मॅकेन्सी ग्लोबलने असा अंदाज वर्तवला आहे की, २०३० पर्यंत, ऑटोमेशनमुळे जगभरातील १५ टक्के कामगारशक्ती आपल्या नोकऱ्या गमावणार आहेत. ऑटोमेशनने अनेक नोकऱ्यांची जागा घेणार असले तरीही, ते अनेक नवीन नोकऱ्या निर्माण करत आहे. या नवीन नोकऱ्यांचे स्वरूप कसे असेल, याची कुणीच कल्पना करू शकत नाही. असा अंदाज आहे की, सध्याच्या कर्मचाऱ्यांपैकी ८ ते ९ टक्के कर्मचारी त्या नव्या नोकऱ्यांचा भाग असतील. भविष्यात, फ्री लान्स आणि अर्धवेळ नोकऱ्या पूर्णवेळ रोजगारांची जागा घेतील. दारोदार जाऊन किराणा सामान विकणारे, मोटर वाहन चालक आणि लेजर अकाऊंट लिहिणाऱ्या लोकांसाठी वाढती मागणी असेल. एकाच प्रकल्पावर विविध देशांतील तज्ञ एकत्र काम करतील. हळूहळू, संघटित आणि असंघटित क्षेत्रातील दरी हळूहळू नष्ट होणार आहे. ग्लोबल डेव्हलपमेंट ग्रुपच्या मतानुसार, सध्या जगभरात ३५० कोटी कर्मचारी आहेत. सध्या यापैकी, केवळ ३ टक्के कर्मचारी फ्रीलान्सर म्हणून काम करत आहेत. हळूहळू, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण संशोधन यांचे महत्त्व वाढत असताना, कमी कौशल्य लागणाऱ्या कामांसाठी रोबो जागा घेतील. बुद्धीमत्ता निर्देशांकासह, भावनिक निर्देशांक भविष्यातील नोकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. रोट मेमोरायझेशनच्या जागी, विश्लेषण आणि तार्किक कौशल्य असलेले, टीकात्मक विचार करणारे, प्रश्न सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता ही यशस्वी होणार आहे. सर्जनशील, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य असलेल्यांची नोकरी आणि व्यवसायात भविष्यात भरभराट होणार आहे, असे ओईसीडीचा अहवाल सांगतो.
हेही वाचा :रोजगार आणि शिक्षणाचे एकत्रिकरण गरजेचे...