महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुणालाही देणार नाही फुटबॉल, मीच खेळणार; पहा फुटबॉल खेळणारी गाय - twitter

या सामन्याची हर्षा भोगले यांनी केवळ एकाच वाक्यात कॉमेंट्री केली आहे. 'This is the funniest thing you will see today!' (ही आजच्या दिवसातली तुम्ही पाहिलेली सर्वात मजेशीर गोष्ट असेल) असं त्यांनी म्हटलं आहे.

फूटबॉलपटू गाय

By

Published : Jul 3, 2019, 10:01 PM IST

Updated : Jul 3, 2019, 10:17 PM IST

गोवा - क्रिकटमधील जाणकार आणि दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनी एका गाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओखाली त्यांनी 'This is the funniest thing you will see today!' (ही आजच्या दिवसातली तुम्ही पाहिलेली सर्वात मजेशीर गोष्ट असेल) असे म्हटले आहे.

हा व्हिडीओ गोव्यातील एका मैदानावरचा आहे. मैदानावर मुले फुटबॉल खेळत होती. त्याचदरम्यान एक गाय मैदानावर आली आणि तिने फुटबॉलवर कब्जा केला. मुले गायीकडून फुटबॉल परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती. तर, गाय कधी 'अटॅक' कधी 'डिफेन्स' करत होती. फुटबॉल परत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या अंगावर येत गाईने त्यांना पळवून लावले. बिचाऱ्या मुलांनी गाईचे लक्ष विचलित करून कसाबसा फुटबॉल मिळवलाच होता. मात्र, त्यानंतर गाय फुटबॉलच्या मागे संपूर्ण मैदानात धावू लागली. त्यानंतर मुले विरुद्ध गाय असा फुटबॉल सामना रंगल्याचे पहायला मिळाल्याने पहाणाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. विशेष म्हणजे एकट्या गायीने पाच-सहा मुलांकडून फुटबॉल परतही मिळवला आणि तो ती घेऊन गोल पोस्टच्याही जवळ पोहोचली होती.

या सामन्याची हर्षा भोगले यांनी केवळ एकाच वाक्यात कॉमेंट्री केली आहे. 'This is the funniest thing you will see today!' (ही आजच्या दिवसातली तुम्ही पाहिलेली सर्वात मजेशीर गोष्ट असेल) असे त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Jul 3, 2019, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details