महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत चीनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा - भारत चीन सीमा वाद

मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकांतून कोणताही तोडगा निघाला नसल्याने वादाचे घोंगडे तसेच भिजत पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आज गुरुवारीही दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

भारत चीन सीमा वाद
भारत चीन सीमा वाद

By

Published : Jun 18, 2020, 4:08 PM IST

नवी दिल्ली- गलवान व्हॅली परिसरातील तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवरील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी दोन्ही देशांतील मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत 20 भारतीय सैनिकांना विरमरण आले. चीनचे सैनिकही यात मारले गेले, मात्र, त्यांनी माहिती उघड केली नाही.

मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकांतून कोणताही तोडगा निघाला नसल्याने वादाचे घोंगडे तसेच तसेच भिजत पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आज गुरुवारीही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 6 जूनला झालेल्या बैठकीतीली निर्णय लागू करण्याबाबत काल (बुधवारी) अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.

सीमेवरील सैनिकांच्या झटापटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला कठोर शब्दांत संदेश दिला. भारताला शांतता हवी आहे. मात्र, जर कोणी खोड काढली तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे मोदी म्हणाले. 1967 नंतर दोन्ही देशांमध्ये प्रथमच सीमेवर जीवितहानी झाली आहे.

कसा सुरू झाला वाद?

भारत सीमांच्या सुरक्षेसाठी चीनी सीमांपासून एकदम जवळ रस्तेबांधणीचे काम करत आहे. त्यावर चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. प्याँगोग त्सो लेक भागातील डोंगररांगातून भारत रस्तेबांधणी करत आहे. तसेच दारबुक- श्योक- दौलत बेग ओल्डी हे भाग भारतास रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून तेथे रस्ते बांधणीचे आणि जोडणीचे काम चालू आहे. यातील गलवान व्हॅली परिसरातील मुख्य रस्त्यापासून बांधण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांना चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. हा भाग चीनच्या हद्दीतील असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, भारताचा याला विरोध आहे.

सोमवारी सकाळी दोन्ही लष्करांमध्ये सुमारे 2 किमी सीमारेषेपासून मागे जाण्याचे ठरले. मात्र, चीनने हा निर्णय लागू केला की नाही, हे पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी काही भारतीय सैनिक गलवान व्हॅली परिसरातील चेकपोस्ट 14 येथे गेले. मात्र, तेथे चीनचा एक तंबू तसाच होता. खरे तर चीनने हा तंबू काढून न्याययला हवा होता. मात्र, त्यांनी तो तसाच ठेवला. त्यामुऴे भारतीय सैनिकांनी हा तंबू नष्ट केला. त्याचवेळी चीनी सैनिकही तेथे आले. हातात खिळे आणि तारा ठोकलेल्या काठ्या घेवून चिनी सैनिकांनी निशस्त्र भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला. यावेळी लाठ्या, काठ्या आणि हाताने तुंबळ हाणामारी झाली. डोंगर उताराचा भाग असल्याने काही जवान श्योक नदीतही पडले. तर काही कमी तापमान असल्याने जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. यामध्ये चीनचे सैनिकही मारले गेले.

ABOUT THE AUTHOR

...view details