दोहा (कतार) -येथे पार पडलेल्या कतार सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमात बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत, गायक मिका सिंग, अभिनेता तसेच कवी असलेला पियुष मिश्रा यांनीदेखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दोन दिवस हा कार्यक्रम सुरू होता.
विविध देशातील संस्कृती आणि साहित्याची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड कलकारांनी धमाकेदार परफॉरमन्स सादर केला.