बिहार -मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवल्याने ते गाईचे मांस खातात. त्यामुळे शाळांमध्ये मुलांना भगवत गीता शिकवली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. बेगुसरायमधील एका धार्मिक कार्यक्रमात लोकांशी संवाद साधताना सिंह बोलत होते.
इंग्रजी शाळांमध्ये शिकवल्याने मुलं खातात गोमांस! - गिरीराज सिंह बिहार न्यूज
शाळांमध्ये मुलांना भगवत गीता शिकवली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. एका धार्मिक कार्यक्रमात लोकांशी संवाद साधताना सिंह बोलत होते.
इंग्रजी शाळांमध्ये शिकवल्याने मुलं खातात गोमांस
हेही वाचा - नववर्षदिनी जगात भारतात झाला सर्वाधिक बालकांचा जन्म
आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकण्यासाठी पाठवतो. तेथे त्यांना आपली संस्कृती आणि मूल्यांची शिकवण मिळतच नाही. ते आयआयटीत शिकून विदेशात जातात आणि तेथे गाईचे मांस खातात. यामागे शाळांची शिकवण जबाबदार आहे. मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजवायची असतील तर, शाळांमध्ये आपण भगवत गीतेचे शिक्षण दिले पाहिजे, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले.