नवी दिल्ली - वातावरणात झालेल्या बदलामुळे लडाख येथील श्योक भागात ८१ पर्यटक अडकून पडले आहेत. भारतीय जवानांनी शुक्रवारी वाचवलेल्या पर्यटकांसाठी आर्मी कॅम्पमध्ये राहण्याची आणि प्रथमोपचाराची सोय केली आहे. यावेळी पर्यटकांनी भारतीय जवानांचे आभार मानले.
भारतीय जवानांनी लडाख येथे अडकलेल्या ८१ पर्यटकांना वाचवले - लडाख
भारतीय जवानांनी शुक्रवारी वाचवलेल्या पर्यटकांसाठी आर्मी कॅम्पमध्ये राहण्याची आणि प्रथमोपचाराची सोय केली आहे.
![भारतीय जवानांनी लडाख येथे अडकलेल्या ८१ पर्यटकांना वाचवले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3559448-thumbnail-3x2-army.jpg)
आर्मी कॅम्पमध्ये असलेले पर्यटक
घटनेची माहिती देताना नॉथर्न कमांडच्या जवानांनी ट्विट करताना लिहिले, भारतीय जवानांनी श्योक भागात अडकलेल्या ८१ पर्यटकांना वाचवले आहे. त्यांना जवानांकडून त्वरीत वैद्यकीय सुविधा आणि गरम कपडे पुरवण्यात आले आहेत. हवामान खराब असल्यामुळे पर्यटकांसाठी आर्मी कॅम्पमध्ये निवाऱ्याची आणि जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे.