देहराडून :भारत-चीन आणि भारत-नेपाळ सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्कराने उत्तराखंडच्या पिठोरगडमधील सीमा भागात सर्वेक्षण केले. पिठोरगडमधील धारचुला तालुक्याची सीमा या दोन्ही देशांना लागून आहे, त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी केला आहे.
२१जूनला इंडो-तिबेटन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी लिपुलेख पास, काला पानी आणि नभिधंग भागाला भेट देत; तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, खबरदारी म्हणून याआधीच सशस्त्र सीमा बलाने नेपाळ सीमेवर अधिक जवान तैनात केले आहेत. तसेच गलवान खोऱ्यात झालेल्या प्रकारानंतर लिपुलेख पास भागातही आयटीबीपी आणि भारतीय लष्कर २४ तास गस्त घालत आहे.