महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'नागरिकांनी अफवांपासून सावध राहावे', सैन्य दलाने जारी केली अॅडव्हायजरी - Amended Citizenship Act 2019

ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व विधेयकाविरोधात विविध ठिकाणी निदर्शने सुरू आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भारतीय सैन्य दलाकडून अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

नागरिकांनी अफवांपासून सावध राहावे
नागरिकांनी अफवांपासून सावध राहावे

By

Published : Dec 14, 2019, 11:33 AM IST

नवी दिल्ली - ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व विधेयकाविरोधात विविध ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. आसाम, त्रिपुरामध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भारतीय सैन्य दलाकडून ईशान्य भारतासंबंधी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सुचना करणारी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.


ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व विधेयक लागू केल्यामुळे संशयास्पद व्यक्तीकडून सोशल मीडियावर खोटे संदेश आणि अफवा पसरवण्यात येत आहेत. या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी खोट्या माहितीपासून सतर्क रहावे , अशी अॅडव्हायजरी सैन्य दलाने जारी केली आहे.


दरम्यान, आसाममधील गुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. ईशान्य भारतामधील परिस्थितीविषयी कोणत्याच अफवा पसरवल्या जाऊ नये, म्हणून सोशल मीडियावरील संदेशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. खोटे संदेश आणि अफवा पसरू नये, यासाठी सैन्य दलाने सावधगिरी बाळगली आहे.


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनामुळे ईशान्येकडील राज्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details