श्रीनगर- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रंसधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. रविवारी पाकिस्तानने सीमेवरील अनेक भागांमध्ये अंदाधुद गोळीबार केला होता. त्यावेळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय हद्दीत पडलेल्या तीन तोफा लष्कराने नष्ट केल्या. पूंछ जिल्ह्याच्या करमारा गावामध्ये लष्कराने ही कारवाई केली.
भारतीय हद्दीत सापडलेल्या ३ पाकिस्तानी तोफा लष्कराने केल्या नष्ट हेही वाचा -'2017 या एकाच वर्षात देशभरात ५० लाख गंभीर गुन्हे; महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक'
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये 2 भारतीय जवानांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान गोळीबाराच्या आडून भारतामध्ये दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याने निलम खोऱ्यातील ३ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. भारताच्या प्रत्युत्तरात ३ दहशतवादी तळ नष्ट झाले असून यामध्ये ५ ते ६ दहशतवादी आणि सैनिक ठार झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.
हेही वाचा -2020 नंतर दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही
गोळीबारात ९ भारतीय सैनिकांना मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. अंदाधुंद गोळीबारामध्ये दोन्ही देशांच्या सीमा भागातील घरांचे नुकसान झाले. २० तारखेला रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर २१ तारखेला सीमेवरील अनेक भागांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या.