नवी दिल्ली -भारतात 59 चीनी अॅपसह टिकटॉक बंद झाल्यानंतर त्याच्याच सारखे फीचर्स असणारे अनेक अॅप्स लाँच झाले आहेत. टिकटॉकनंतर चिल 5 अॅपला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले हे अॅप अनेकांनी डाउनलोड केले आहे.
टिकटॉकनंतर 'या' अॅपला मिळतोय लोकांचा प्रचंड प्रतिसाद - चिल 5 अॅप
टिकटॉकनंतर चिल 5 अॅपला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले हे अॅप अनेकांनी डाउनलोड केले आहे.
तामिळनाडूमधील तिरुपूर येथील तरुणांनी हे अॅप तयार केले आहे. टिकटॉकला पर्याय म्हणून तरुणांनी हे अॅप बनवले. 2016 पासून आम्ही हे मोबाइल अॅप्स विकसित करत होतो. या वर्षातील जानेवरीपासून आम्ही यावर वेगाने काम केले. अॅपचे काम पूर्ण झाले असून ते गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध झाले आहे. सुरवातीला प्रतिसाद इतका उत्साहवर्धक नव्हता. मात्र, आता अनेकांनी अॅपला पंसती दिली आहे, असे चिल 5 अॅप तयार करणाऱ्या टीममधील सदस्य हरिष याने सांगितले.
टिकटॉकला बंदी घालण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे 4 जूनला हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. दररोज 1 हजार जण हे अॅप डाऊनलोड करत आहेत. या अॅपमध्ये , इंग्रजी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्ल्यालम आदी भाषांचा समावेश आहे.