नवी दिल्ली - आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे लष्करी विमान बेपत्ता झाले आहे. विमान अरुणाचल प्रदेश येथील मेनचुका विमानतळाकडे निघाले होते. विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी आहेत. १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विमानाचा संपर्क तुटला आहे. मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करुन माहिती देताना लिहिले आहे, की मी एअर मार्शल राकेश सिंह भादौरिया यांच्याकडून बेपत्ता विमान घटनेची माहिती मागवली आहे. सद्यपरिस्थितीबद्दल भारतीय वायुसेना काय पावले उचलत आहे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. एअर मार्शलनी मला परिस्थितीबद्दल सर्व माहिती दिली आहे. मी विमानातील सर्व वायुसेनेचे सर्व कर्मचारी सुखरुप असावेत, अशी प्रार्थना करतो.
भारतीय वायुसेनेकडून शोधकार्य सुरू