जोरहाट- भारतीय वायुसेनेचे आयएएफ एएन-३२ हे विमान बेपत्ता होऊन ६ दिवस उलटले आहेत. तरीही, विमानाचा शोध लागला नाही. यामुळे, आयएएफ एएन-३२ विमानाचा आढावा घेण्यासाठी जोरहाट येथे एअर चीफ मार्शल बीएस धनोआ स्वत: गेले आहेत. त्यांनी शनिवारी भेट देताना बेपत्ता झालेल्या विमानाचा शोधाबद्दल माहिती घेतली.
बीएस धनोआ बेपत्ता विमानाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, भारतीय वायुसेना बेपत्ता झालेल्या विमानाबाबत कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना माहिती देत आहे. आम्ही कठीण काळात त्यांच्यासोबत आहोत. विमानाचा शोध घेण्यासाठी आम्ही शक्य तेवढी पाऊले उचलणार आहोत.
हेलिकॉप्टर्सद्वारे विमानाचा रात्रंदिवस शोध घेण्यात येत आहे. रात्री लेझर यंत्रणेद्वारे शोध घेण्यात आहे. परंतु, अजूनही विमानाचे अवषेश सापडले नाहीत. याबरोबरच नौदलाचे पी-८१ आणि ग्लोबल सर्विलेंस विमाने एनटीआरओ उपग्रहाद्वारे शोध सुरू आहे. सोबत पहिल्या दिवसापासूनच सुखोई आणि सी-१३० जे विमाने आणि काही पथके प्रत्यक्ष जमिनीवरुन शोध घेत आहेत.
आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे विमान ३ जूनला १२ वाजून २५ मिनिटांनी बेपत्ता झाले होते. या विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी आहेत. अरुणाचल प्रदेशातील मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे.