तीय हवाई दलाचे विंग कमांडर अरविंद सिन्हा यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी मंगळवारी एअरफोर्स कॉलनीतील एका क्वार्टरमध्ये आपल्याच डबल बॅरल बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली. ते सेंट्रल एअर कमांडचे जनसंपर्क अधिकारी(पीआरओ) होते.
हवाई दलाच्या विंग कमांडरची गोळी झाडून आत्महत्या, डबल बॅरल बंदुकीने झाडली गोळी - अरविंद सिन्हा
हवाई दलाचे विंग कमांडर अरविंद सिन्हा यांची गोळी झाडून आत्महत्या... स्वतःच्याच डबल बॅरल बंदुकीने झाडली गोळी... एअरफोर्स कॉलनीतील क्वारटरमध्ये घडली घटना...
![हवाई दलाच्या विंग कमांडरची गोळी झाडून आत्महत्या, डबल बॅरल बंदुकीने झाडली गोळी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2560622-291-7a9b0443-aece-4c22-92fd-1897f860bf85.jpg)
संग्रहित छायाचित्र
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांना तपासात कुठल्याही प्रकारची सुसाइड नोट मिळालेली नाही. अरविन्द सिन्हा हे बिहारचे रहिवासी आहेत. पोलीस आत्महत्येचा तपास करत आहेत.