नवी दिल्ली -बहुप्रतीक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर हा सोहळा संपन्न झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय हवाईदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे.
अंबाला हवाईतळावर हा कार्यक्रम पार पडत असून यासाठी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्यासमावेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि हवाईदल प्रमुख राकेशकुमार भदौरिया यांनी हजेरी लावली. तसेच संरक्षण खात्याचे सचिव अजय कुमार हे देखील उपस्थित होते. राफेलचा समावेश करताना सर्वधर्म पूजा करण्यात आली. यावेळी विविध विमानांच्या कसरतींचे सादरीकरण करण्यात आले. तसेच तेजस विमानांसह ‘सारंग'ने हवाई चमूने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या.