महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अत्याधुनिक चिनूकनंतर ‘अपाची’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल - america

अॅरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्सपैकी आहे. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. भारताने अमेरिकेबरोबर २२ अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे.

अपाची

By

Published : May 11, 2019, 11:59 AM IST

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. हे लढाऊ हेलिकॉप्टर असून शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. तसेच, यामध्ये ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्त करण्यात आले.

अॅरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्सपैकी आहे. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. भारताने अमेरिकेबरोबर २२ अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. मागच्या वर्षी ट्रम्प प्रशासनाने भारताला अपाची हेलिकॉप्टर विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिली. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.

२२ पैकी अकरा अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-७८ लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील. तसेच अपाची दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-३५ ची जागा घेतील. अपाची हे क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले हेलिकॉप्टर आहे. दोन महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफा वाहून नेण्यास सक्षम आहे.

शत्रूपक्षाची तयारी

पाकिस्तानी लष्कराकडे अमेरिकन बनावटीचे एएच-१ कोब्रा हेलिकॉप्टर आहे. त्यांना टर्कीकडून तीस टी-१२९ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. ही दोन्ही लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. चीनकडे झेड-१० लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details