नवी दिल्ली - भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील तीन ठिकाणांवरून सैन्य काढले आहे. असे असले तरी प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ असलेले चीनने दहा हजार सैनिक हटविले नाहीत. हे होईपर्यंत भारताच्या दृष्टीने सीमेवरील तणावाची स्थिती कायम असणार आहे.
दोन्ही देशांमध्ये विश्वास वाढावा, यासाठी मेजर जनरल पातळीवरील बैठकीला बुधवारपासून सुरुवात होत आहे. दोन्ही देशांचे सैनिक हे सीमारेषेवर 6 जूनपासून आमने सामने उभे ठाकले आहेत.
गलवान , पेट्रोलिंग पॉईंट, हॉट स्प्रिंग येथून चीनने 2 ते 2.5 किलोमीटर सैनिक मागितले घेतले आहे.
चीनने सीमेजवळ 10 हजारांहून तुकड्या आणल्यानंतर भारतानेही तेवढेच सैन्य तैनात केले होते, असे सूत्राने सांगितले. गेल्या महिन्यात चीनचे सैनिक हे भारतीय सैनिकांच्या समोर येऊन उभे ठाकले होते, असे सूत्राने सांगितले. यावेळी चिनी सैन्याकडे लढाऊ आणि जड वाहने होती. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या दहा दिवसांत दोन्ही देशांच्या मेजर जनरल व ब्रिगेड पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे.
चीनने लढाऊ विमाने आणि बॉम्ब वर्षाव करणारे विमाने प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक असलेल्या होटन व गार गुनासाच्या धावपट्टीवर तैनात केले आहेत. सामान्य स्थितीत अशी सैनिकांची जुळवाजुळव करण्यात येत नाही.