नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात 38 हजार 772 नवे रुग्ण आढळले असून 443 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येने 94 लाखाचा आकडा पार केला आहे. तर, यात आतापर्यंत 88 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 4 लाख 46 हजार 952 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यनिहाय कोरोनाचा प्रसार पाहता सर्वांत जास्त प्रादुर्भाव महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे.
देशातील रिकव्हरी रेट 93.81 टक्के आहे. तर 1.45 टक्के मृत्यूदर आहे. आतापर्यंत एकूण 94 लाख 31 हजार 692 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 37 हजार 139 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी 45 लाख 333 जणांना डिस्चार्ज दिल्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 88 लाख 47 हजार 600 झाली आहे. महाराष्ट्रात सध्या 92 हजार 62 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 47 हजार 71 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रपाठोपाठ केरळमध्ये 64 हजार 719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा प्रसार झाला होता. तेव्हा देशात फक्त कोरोना चाचणी करणारी एकच प्रयोगशाळा होती. मात्र, सध्या देशात तब्बल 2 हजार 165 प्रयोगशाळा आहेत. यात 1 हजार 175 सरकारी आणि 990 खासगी प्रयोगशाळा आहेत. रविवारी 8 लाख 76 हजार 173 कोरोना चाचण्या करण्यता आल्या असून आतापर्यंत तब्बल 14 कोटी 3 लाख 79 हजार 976 चाचण्या झाल्या आहेत.