महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा विळखा घट्ट... नव्या 56 हजार 282 रुग्णांची नोंद, तर 904 जणांचा बळी

गेल्या 24 तासात नव्या 904 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकूण मृताचा आकडा 40 हजार 699 वर पोहचला आहे. तसेच देशात तब्बल 5 लाख 95 हजार 501 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 13 लाख 28 हजार 337 जण पूर्णत: बरे झाले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Aug 6, 2020, 11:58 AM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांनी 19 लाखाचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 56 हजार 282 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 लाख 64 हजार 537 वर पोहचली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये नव्या 904 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकूण मृताचा आकडा 40 हजार 699 वर पोहचला आहे. तसेच देशात तब्बल 5 लाख 95 हजार 501 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 13 लाख 28 हजार 337 जण पूर्णत: बरे झाले आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रकोप पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रामध्ये तब्बल 334 जणांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा 16 हजार 476 वर पोहचला आहे. तर दिल्लीमध्ये 11 आणि गुजरातमध्ये 23 जणांचा बळी गेला आहे. तसेच कर्नाटकमध्ये 100 आणि तामिळनाडूमध्ये 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान देशभरामध्ये आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 49 हजार 351 कोरोना चाचण्या केल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 6 लाख 64 हजार 949 कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details