महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'उर्जेसंबंधी पायाभूत सुविधांमध्ये भारत करणार १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक' - मोदी रियाध भाषण

रियाधमध्ये भविष्यातील गुंतवणुकीवरील पुढाकारासाठी झालेल्या परिषदेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचा पुनरुच्चार केला. तसेच, काही प्रादेशिक आणि काही जागतीक समस्यांबाबत बोलतानाच त्यांनी हेही स्पष्ट केले, की भारताने २०२४ पर्यंत परिष्करण, पाईपलाईन आणि गॅस टर्मिनल्समध्ये १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे.

Saudi Arabia's annual investment forum

By

Published : Oct 30, 2019, 11:04 AM IST

रियाध -रियाधमध्ये भविष्यातील गुंतवणुकीवरील पुढाकारासाठी झालेल्या परिषदेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचा पुनरुच्चार केला. यासोबतच गुंतवणुकदारांसाठी भारतात व्यापार करणे सोयीस्कर व्हावे यासाठी भारत सरकारने घेतलेल्या काही निर्णयांबाबतही ते बोलले. तसेच, काही प्रादेशिक आणि काही जागतिक समस्यांबाबत बोलतानाच त्यांनी हेही स्पष्ट केले, की भारताने २०२४ पर्यंत परिष्करण, पाईपलाईन आणि गॅस टर्मिनल्समध्ये १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे.

'उर्जेसंबंधी पायाभूत सुविधांमध्ये भारत करणार १०० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक'

याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सौदीमधील तेल व्यापाऱ्यांना गुंतवणुकीसाठी भारताकडे पर्याय म्हणून पाहण्याचे आवाहन केले. उर्जेचा वापर करण्यामध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला ८३ टक्के कच्चे खनिजतेल हे परदेशातून आयात करावे लागते. तर, ५० टक्के वायू हा परदेशातून आयात केला जातो. सौदी अरेबिया हा भारताला खनिजतेलाचा पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळेच भारत हे औद्योगिक संबंध आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताच्या जलदगतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारतात मोठ्या प्रमाणावार उर्जा क्षेत्रात गुंतवणूक होणे आवश्यक ठरत आहे. त्यामुळे इथे उपस्थित सर्व उद्योगसमूहांना मी हे आवाहन करतो, की या संधीचा आपण फायदा घ्यावा. असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले. तर, सौदीची राष्ट्रीय अ‌ॅरामको ही कंपनी महाराष्ट्रात होत असलेल्या एका परिष्करण केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा आलेख असाच चढता राहणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. भारतामध्ये उद्योग आणि व्यापार करणे अधिकाधिक सोईस्कर व्हावे यासाठी आम्ही काही पावले उचलत आहोत. यामुळे भारतात गुंतवणूक करणे हे तुम्हालादेखील फायद्याचे ठरेल. विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधांची गरज ही अधिक आहे. आशिया खंडामध्ये दरवर्षी ७०० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज असते. पुढील काही वर्षांमध्ये भारतदेखील १.५ ट्रिलियन डॉलर्स एवढी गुंतवणुक पायाभूत सुविधांमध्ये करणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच, भारतामध्ये 'स्टार्ट-अप'साठीही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, भारतात स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना केले.

हेही वाचा : सौदी राजवट गुंतवणुकीला आकर्षित करत 'वाळवंटातील दाव्होस'मध्ये झाले मोदींचे भाषण

ABOUT THE AUTHOR

...view details