महाराष्ट्र

maharashtra

भारत 'स्पुटनिक व्ही'च्या 300 दशलक्ष डोसची करणार निर्मिती : आरडीआयएफ

By

Published : Dec 18, 2020, 7:10 PM IST

भारत 2021 मध्ये रशियन कोरोना विषाणूविरोधी लस स्पुटनिक व्हीच्या सुमारे 300 दशलक्ष डोसची निर्मिती करेल, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) शुक्रवारी दिली. चार मोठ्या उत्पादकांसह यासाठीची व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी 10 उत्पादने साइटस निवडल्या गेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

स्पुटनिक व्ही कोरोना लस न्यूज
स्पुटनिक व्ही कोरोना लस न्यूज

नवी दिल्ली - भारत 2021 मध्ये रशियन कोरोना विषाणूविरोधी लस स्पुटनिक व्हीच्या सुमारे 300 दशलक्ष डोसची निर्मिती करेल, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) शुक्रवारी दिली. चार मोठ्या उत्पादकांसह यासाठीची व्यवस्था केली गेली आहे. त्यासाठी 10 उत्पादने साइटस निवडल्या गेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोरिया, ब्राझील आणि चीनसारख्या इतर देशांमध्ये स्पुतनिक व्हीचे उत्पादन यापूर्वीच सुरू झाले असल्याची माहिती आरडीआयएफचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी दिली.

स्पुतनिक व्हीच्या क्लिनिकल चाचण्यांच्या अंतिम नियंत्रण आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे या लसीची 91.4 टक्के कार्यक्षमता असल्याची पुष्टी झाली होती. ही गणना स्वयंसेवकांच्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित होती. त्यांना तिसऱ्या फेजमधील क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉलच्या अनुषंगाने 78 पुष्टी केलेल्या प्रकरणांच्या तिसऱ्या आणि अंतिम नियंत्रण बिंदूवर लसीचा पहिला आणि दुसरा डोस प्राप्त झाला.

हेही वाचा -'नवे कृषी कायदे एका रात्रीत मंजूर झाले नाहीत'

भारतात, डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळांमध्ये आणि आरडीआयएफने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.

विशेष म्हणजे, डॉ. रेड्डीज यांनीही लसीच्या आपात्कालीन वापराच्या अधिकृत परवानगीसाठी भारतातील ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी (डीसीजीआय) संपर्क साधला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि भारत बायोटेक या दोन अन्य देशी फार्मा कंपन्यांनीही आपल्या कोविड - 19 लसीच्या आपात्कालीन वापराच्या अधिकृत परवानगीसाठी संपर्क साधला आहे.

11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड - 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. रशियाच्या या लसीचे नाव स्पुटनिक व्ही. असून ते रशियाच्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा -बुरख्यातील मतदारांच्या ओळख तपासणीसाठी महिला जवान तैनात करा; पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details