नवी दिल्ली -भारताने रविवारी भारतीय नौदलाच्या स्टेल्थ डिस्ट्रॉयरचा वापर करून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी प्रक्षेपणासाठी डीआरडीओ, ब्रह्मोस आणि भारतीय नौदलाला शुभेच्छा दिल्या.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने (डीआरडीओ) एका निवेदनात सांगितले की, 'ब्रह्मोस, सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाच्या स्वदेशी रुपातील स्टेल्थ डिस्ट्रॉयर (स्टेल्थ विनाशिका) आयएनएस चेन्नईकडून 18 ऑक्टोबर रोजी यशस्वी चाचणी झाली."
हेही वाचा -जेसीसी पक्षाला मोठा झटका; अमित जोगी, रिचा जोगी यांचा उमेदवारी अर्ज अवैध
ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य यशस्वीरीत्या भेदले. ब्रह्मोस 'प्राइम स्ट्राइक शस्त्र' म्हणून बऱ्याच लांबपर्यंत मारा करून युद्धात भारताचा विजय निश्चित करेल. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाद्वारे एकत्रित डिझाइन व विकसित केलेले आहे.
डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी यांनी या कामगिरीसाठी डीआरडीओचे शास्त्रज्ञ आणि सर्व कर्मचारी, ब्रह्मोस, भारतीय नौदल आणि कारखान्यांनाही शुभेच्छा दिल्या. ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे अनेक भारतीय शस्त्रास्त्र सज्जतेत महत्त्वाची भर पडेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा -हैदराबादेतील फार्मा कंपनीने घेतले 27 प्राण्यांना दत्तक; वाघ, सिंहाचा समावेश