नवी दिल्ली - भारत हळूहळू शस्त्र निर्यात करणार देश बनत चालला आहे. सद्यस्थितीत शस्त्रास्त्रांची निर्यात ११ हजार कोटी असली तरी २०२४ पर्यंत भारताची निर्यात सुमारे ३५ हजार कोटी होणार असल्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. ते दिल्लीमध्ये स्वदेशी संरक्षण सामुग्री निर्यात असोशिएशनद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.
हेही वाचा -करतारपूर गुरुद्वाराला भेट देण्यासाठी पैसे मोजा, पाकिस्तानने करारात घातला खोडा
निर्यात वाढण्यासाठी संरक्षण मंत्रालयाशी सहकार्य करणार असून निर्यातीबरोबरच देशाची संरक्षण सिद्धताही वाढणार आहे. जागतिकीकरणामध्ये इतर देशांच्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे असल्याचेही मत रावत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -पोलिसांचा 'अजब' कारभार, ट्रक चालकाला विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे पाठवले चलन
मागील आठवड्यात बिपीन रावत यांनी डीआरडीओ अत्याधुनिक देशी तंत्रज्ञान विकासित करत असल्याबद्दल कौतुक केले होते. आम्हाला विश्वास आहे देशामध्ये बनलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आम्ही भविष्यातील युद्ध नक्कीच जिंकू, असे रावत म्हणाले होते. सायबर, लेझर, इलेक्ट्रॉनिक, रोबोट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत रावत यांनी व्यक्त केले होते.