नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. त्यावर संपूर्ण देशात चीन विरोधात संतापाची लाट पसरली असून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू येत आहे. भारताने इतर देशांकडून विशेषत: चीनकडून आयात कमी केली पाहिजे, असे प्रतिपादन भाजप नेते राम माधव यांनी गुरुवारी केले.
भारतामध्ये रसायने, मोबाईल फोनचे भाग आणि बटणे तयार करण्याची क्षमता आहे. आपन चीनकडून रसायने, मोबाईल फोनचे भाग आणि बटणे आयात करतो. ते आयात करणे इतके आवश्यक आहे का? ते भारतात तयार केले जाऊ शकतात. आपण इतर देशांकडून विशेषत: चीनकडून आयात कमी केली पाहिजे, असे राम माधव म्हणाले.