नवी दिल्ली -अयोध्येमध्ये काल (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य समारोहात राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. या सोहळ्यावर पाकिस्तानने टिका केली आहे. त्यास भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने विरोध दर्शवला असून प्रत्युत्तर दिले आहे. जातीयवाद पसरवणारी भावना भडकावणारी वक्तव्ये पाकिस्तानने थांबवावे, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये ढवळाढवळ करू नका, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. 'भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर पाकिस्तानने वक्तव्य जारी केले आहे. त्यांनी भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये नाक खुपसणं बंद करून जातीय चिथावणीखोर वक्तव्य करणे थांबवावे, असा इशारा श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला दिला आहे.