नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 16 हजारांचा आकडा पार केला. भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांवर गेली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे.
देशात 4 लाख 73 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 86 हजार 514 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 71 हजार 697 जण बरे झाले आहेत. तर, 14 हजार 894 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...