महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात गेल्या 24 तासांत आढळले 11 हजार 502 कोरोनाबाधित ; तर 325 जणांचा बळी - कोरोना अपडेट

देशात 3 लाख 32 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 53 हजार 106 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 1 लाख 69 हजार 798 जण बरे झाले आहेत. तर, 9 हजार 520 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Jun 15, 2020, 10:24 AM IST

नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखापेक्षा अधिक झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 11 हजार 502 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 325 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 3 लाख 32 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 53 हजार 106 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 1 लाख 69 हजार 798 जण बरे झाले आहेत. तर, 9 हजार 520 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 3 हजार 950 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 7 हजार 958 वर गेली आहे. यातील एकूण 53 हजार 30 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 50 हजार 978 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्लीमध्ये 41 हजार 182 कोरोनाबाधित आहेत. तर 1 हजार 327 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 हजार 32 रुग्ण सक्रिय आहेत. तर 15 हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुजरात राज्यात 23 हजार 544 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 477 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 16 हजार 325 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 5 हजार 742 रुग्ण सक्रिय आहेत.

तामिळनाडूमध्ये 44 हजार 661 कोरोनाबाधित तर 435 जणांचा बळी गेला आहे. तसेच 24 हजार 547 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 19 हजार 679 जणांवर उपचार सुरू आहेत.

अंदमान- निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझारोम, नागालँड, सिक्किम आणि दमन आणि दिव, दादरा आणि नगर हवेली येथे एकही कोरोनाबाधिताचा अद्याप मृत्यू झालेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details