नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 10 हजार 956 कोरोनाबाधित आढळले असून 396 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखाजवळ पोहचला आहे. 2 लाख 97 हजार 535 कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळले आहेत. यात 1 लाख 41 हजार 842 अॅक्टिव्ह केस आहेत. तर 1 लाख 47 हजार 195 जण पूर्णत: बरे झाले असून 8 हजार 498 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लॉकडाउन अधिक शिथिल करण्यात आल्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.