महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जागतिक स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात भारत ९५ व्या स्थानावर - -global-gender-equality

आशियायी देश आणि पॅसिफिक समुदायातील देशांतमध्येही भारताचे स्थान समाधानकारक नाही.  २३ आशियायी देशांत भारत १७ व्या स्थानी आहे.

स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात भारत ९५ व्या स्थानावर

By

Published : Jun 5, 2019, 8:20 AM IST

नवी दिल्ली - वैश्विक स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात १२९ देशांमध्ये भारत ९५ स्थानावर आहे. ही यादी गरिबी, आरोग्य, शिक्षण, साक्षरता, राजकीय प्रतिनिधित्व आणि कामाच्या ठिकाणावरील समानता या मुद्द्यांचा अभ्यास करून तयार करण्यात आली आहे.

या निर्देशांकात भारताला जगात १२९ देशांमध्ये ९५ वे स्थान मिळाले आहे. भारताला सर्वाधीक गुण आरोग्य (७९.९) भूक आणि पोषण (७६.२), उर्जा क्षेत्र (७१.८) यामध्ये मिळाले आहे. तर सर्वात कमी गुण समान भागीदारी क्षेत्र (१८.३), उद्योग आणि पायभूत सुविधा आणि नुतनीकरण (३८.१) यात मिळाले आहे. आशियायी देश आणि पॅसिफिक समुदायातील देशांतमध्येही भारताचे स्थान समाधानकारक नाही. २३ आशियायी देशांत भारत १७ व्या स्थानी आहे.

स्त्री-पुरूष समानता निर्देशांकात भारत ९५ व्या स्थानावर

या यादीत पहिल्या स्थानावर डेन्मार्क तर शेवटच्या स्थानी चाड हा देश आहे. चीन या यादीत ७४ व्या स्थानी असून आपल्या शेजारील पाकिस्तान ११३ व्या, नेपाळ १०२ तर बांग्लादेश ११० व्या स्थानावर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details