नवी दिल्ली :ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या २०२०च्या आकडेवारीनुसार, भारत आता पहिल्या ५० देशांमध्ये आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची झेप घेत, देश आता ४८व्या स्थानी पोहोचला आहे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)ने आपली वार्षिक आकडेवारी जाहीर केली, त्यात ही बाब समोर आली आहे.
२०१५साली भारत या यादीमध्ये ८१व्या स्थानी, तर २०१८ मध्ये ५२व्या स्थानी होता. विपोच्या अहवालानुसार, दक्षिण आणि मध्य आशियाई भागामध्ये प्रमुख इनोवेशन अचीवर्स म्हणूनही भारताचे नाव पुढे आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या रँकिंगमध्ये सातत्याने सुधारणा दाखवल्यामुळे भारताचा यात समावेश झाला आहे.